'दंगल'ची धाकड़ गर्ल वादात, नेटिझन्सचा पाठिंबा

आमिर खानच्या दंगल या चित्रपटातील लहानग्या गीताच्या रुपात दिसणारी धाकड गर्ल जायरा वसीम वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. पण #ZairaWasim या हॅशटॅगसह ट्विट नेटिझन्सने तिची बाजू घेऊन तिला पाठिंबा दर्शवला आहे. 16 वर्षाच्या जायरा वासीमने नुकतीच जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतली. यानंतर तिला सोशल मीडियातून ट्रॉल करण्यात आलं. मात्र, यावर तिने आपल्या वर्तुणूकीवर सोशल मीडियातूनच जाहीर माफी मागितली. पण हा माफीनामा तिने मात्र तीनच तासात सोशल मीडियातून हटवला.
जायराने फेसबुक पोस्टमधील आपल्या माफीनाम्यामध्ये, मी नुकतेच ज्यांना भेटले, त्यांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर मी ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांची जाहीर माफी मागते. मात्र, अनेकवेळा परिस्थितीच्या मागे कुणाचेच काही चालत नाही, हे समजून घेण्याची अपेक्षा व्यक्त करते, असं म्हटलं आहे. ओमर अब्दुल्लासह अनेकांनी जायराच्या समर्थमार्थ ट्विट करत तिला पाठिंबा दर्शवला आहे.