दीपिका-विन डिझेलचे भारतात शानदार स्वागत


हॉलिवूडचा सुपरस्टार विन डिझेलने आगामी 'ट्रिपल एक्स - द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात एन्ट्री केली. ढोल-नगार्‍यांच्‍या गजरात विनचे स्‍वागत करण्‍यात आले. विन आणि दीपिकाचे फॅन्‍सनी आज सकाळी विमानतळावर हजेरी लावली. विन डीजल दोन दिवस मुंबईमध्‍ये राहणार आहे. 
या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असणाऱ्या दीपिका पदुकोणने ट्विटवरून माहिती दिली होती की, 'विन भारत तुझी वाट पाहत आहे. आपण लवकरच १२ आणि १३ जानेवारीला भेटू. आमच्या कडून तुला भरपूर प्रेम.'
                                                                                                       Image- GettyImage
'ट्रिपल एक्स - द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज' हा दीपिकाचा विनसोबतचा पहिला हॉलिवूड चित्रपट आहे. प्रियांका चोप्रा हिच्या बरोबर हॉलीवूडमध्ये काम करणारी ती दुसरी अभिनेत्री आहे. दोघींनी बॉलीवूडचा झेंडा हॉलीवूडवर फडकवला आहे. एक्सएक्सएक्स : रिटर्न ऑफ एक्सेंडर केज'चे दिग्दर्शन डीजे क्रूसो यांचे असून हा चित्रपट २००२ मध्ये आलेल्या 'एक्सएक्सएक्स' आणि २००५ मध्ये आलेल्या 'एक्सएक्सएक्स : स्टेट ऑफ यूनियन' चित्रपटाचा पुढील भाग आहे.
चित्रपटाच्‍या प्रचारासाठी दीपिका आपल्‍या वाढदिवसाच्‍या निमित्ताने मेक्‍सिकोत होती. त्‍यानंतर लंडनमध्‍ये चित्रपटाच्‍या प्रचारानंतर आपल्‍या टीमसोबत ती भारतात परतली. हा चित्रपट प्रथम भारतात १४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. तर इतर देशांमध्‍ये १९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.