'सखाराम बाईंडर'मध्‍ये दिसणार मुक्‍ता



'सखाराम बाईंडर'मध्‍ये दिसणार मुक्‍ता
नाटककार विजय तेंडुलकर यांचे गाजलेले 'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्‍हा एकदा रंगभूमीवर येणार आहे. या नाटकासासाठी अष्‍टपैलू अभिनेत्री मुक्‍ता बर्वे महत्त्‍वाच्‍या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
'ललित कला केंद्रा'च्या विद्यार्थ्यांचे एक ' रियुनिअन' होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी एक कल्पना पुढे आणत 'सखाराम' हे नाटक पुढील महिन्यात रंगभूमीवर अवतरणार आहे. या नाटकात मुक्‍तासोबत अभिनेता संदीप पाठकही भुमिकेत दिसणार आहे.
स्‍वत : मुक्‍ताने याबाबतची माहिती आपल्‍या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तिने फेसबुक पोस्‍टमध्‍ये म्‍हटले आहे, 'तब्बल १६ वर्षांनंतर त्याच टीमबरोबर तोच काळ पुन्हा जगताना इतकं सुंदर वाटतंय. आम्ही ललित कला केंद्र मधले सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा जुन्या एनर्जीनी नव्या जोमात तालिम करतोय. मस्त वाटतंय. Reunion ची ही वेगळीच कल्पना. त्याच टीम बरोबर February मधे रंगणार सखाराम बाइंडरचे ५ प्रयोग. बाकी माहिती हळूहळू सांगेनच.'
स्‍त्री-पुरुष संबंधाचे वास्‍वव चित्रण नाटकामध्‍ये आहे. सखाराम बाईंडर हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेले स्त्री-पुरुष संबंधांवरचे एक नाटक आहे. हे नाटक स्त्रीवादी दृष्टिकोनातून आहे. 'सखाराम बाईंडर'मध्ये हाताळलेला हा स्फोटक विषय होता. निळू फुले, लालन सारंग या कलाकारांनी या नाटकाचा पहिला प्रयोग केला होता. पहिला प्रयोग १९७२ मध्ये झाला.